S M L

नो एंट्री,पाक खेळाडूंना व्हिसा नाकारला

Sachin Salve | Updated On: Sep 11, 2013 09:06 PM IST

Image img_202202_pakteam_240x180.jpg11 सप्टेंबर : सीमारेषेवर पाक सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध ताणले गेलेत. याचा फटका आता चॅम्पियन्स लीग टी 20 ला बसणार आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या चॅम्पियन्स लीगमध्ये पाकिस्तानची फैझलाबाद वूल्व्हस ही टीम खेळणार होती.

 

पण पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारमधील सूत्रांकडून कळतंय. जर पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळाला नाही तर इतर 3 टीम्समधून क्वालिफायर्स खेळवल्या जातील असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2013 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close