S M L

उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या जिभेला चटके

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2013 07:44 PM IST

उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या जिभेला चटके

nagar story14 सप्टेंबर : केवळ एका प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं विद्यार्थ्याच्या जिभेवर चटके देण्याचा अमानुष प्रकार अहमदनगर येथील यशश्री ऍकडमीमध्ये घडलाय. 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडलीय.

 

नगर-औरंगाबाद रस्त्यावरच्या धनगरवाडी इथल्या यशश्री ऍकेडमीत सहावीत शिकत असलेल्या पवन रोहिडा या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं त्याला वर्गाच्या बाहेर उभं करण्यात आलं. यानंतर वर्ग शिक्षकांनी पवनला संस्थेच्या अध्यक्षा अनुरिता शर्मा यांच्याकडे नेलं. अनुरिता शर्मा यांनी या विद्यार्थ्याला मारहाण करत जिभेवर आगपेटीच्या काडीने चटके दिले.

 

पवन घरी गेल्यानंतर त्याने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला पण त्याच्या घरच्यांना हा प्रकार दंगा मस्तीतून झाला असावा असं वाटलं. पण दोन दिवसांनंतर त्यांची प्रकृती खालावली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर पवनने आपल्यासोबत घडलेली हकीकत पालकांना सांगितली.

 

याप्रकरणी अगोदर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केली. मात्र आयबीएन लोकमतच्या टीमने पाठपुरावा केलानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, ऍकेडमीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं प्राचार्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2013 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close