S M L

बदलापुरमध्ये चिमुरडीवर बलात्कार,नराधम अटकेत

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2013 02:58 PM IST

Image img_237192_nagpurrapecase34_240x180.jpg14 सप्टेंबर : दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणी चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, पण नराधमांना अजूनही अद्दल घडलेली नाही. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये एक चिमुरडीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय.

 

सीनिअर केजीमध्ये शिकणार्‍या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय. बदलापूरच्या डॉन बॉस्को शाळेची ही विद्यार्थिनी आहे. खाजगी स्कूल बसमध्ये बसच्या कर्मचार्‍यानं हा बलात्कार केलाय. या बस कर्मचार्‍याचं नाव संदीप करवेला असून त्याला पोलिसांनी अटक केलीय.

 

या नराधमानं या मुलीला खाऊचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केलाय. यानंतर या मुलीनं पोटात दुखत असल्याची तक्रार आपल्या आत्याकडे केलीय आणि त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे मुलीची तपासणी केली. त्यात या मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2013 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close