S M L

हा मार्ग धोक्याचा : रेल्वेतून प्रवास करताना दशरथ शेवाळे झाले अपंग

31 जानेवारी, मुंबईरोहिणी गोसावी ' आयबीएन लोकमत 'नं मुंबईतली रेल्वे आणि रेल्वेमुळे होणारे अपघात यावर ' हा मार्ग धोक्याचा ' या नावानं मालिका बनवली आहे. या मालिकेतली आजची स्टोरी होती दशरथ शेवाळेंवर. रेल्वेप्रवासी दशरथ शेवाळेंना रेल्वेगाडीतून तीन अज्ञात माणसांनी ढकलून दिलं.ते कांदिवली आणि बोरिवली स्टेशनच्या मध्ये असणार्‍या खाडीत पडले. रात्रभर मदत न मिळाल्यामुळं त्यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले. पण रेल्वेनं या अपघातात नुकसानभरपाई द्यायचं नाकारलं.52 वर्षाच्या दशरथ शेवाळेंचं ग्रँट रोडला लॉन्ड्रीचं दुकान होतं. एरवी रविवारी घरी असणारे दशरथ शेवाळे दुकानात दसर्‍याची पूजा करायला त्या रविवारी दुकानात गेले होते. घरी परत यायला त्यांना उशीर झाला. रात्री अकरा वाजता कोणीतरी तीन लोकांनी त्यांना गाडीत धक्काबुक्की करायला सुरुवात केली. गाडीत गर्दीच नसल्यानं त्यांना प्रतिकार करता आला नाही. प्रतिकार करता करता त्या लोकांनी त्यांना गाडीतून खाली ढकलून दिलं आणि गाडी पुढं निघून गेली. " मला जर वेळीच मदत झाली असती तर आज माझी परिस्थिती सुधारली असती, " असं पीडित दशरथ शेवाळे यांचं म्हणणं आहे. दशरथ शेवाळे बेशुध्द होऊन 27 फुटावरून खाडीत पडले. त्यांना सकाळी जाग आल्यावर त्यांनी लोकांना जमा केलं. शेवाळेंना भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तीन महिने उपचार करूनही त्यांच्यात फरक पडला नाही तेव्हा त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.तिथंही तीन महिने उपचार घेतले.पण पाठीला झालेली जखम भरून निघत नसल्यानं त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. या दरम्यान दिनेशनं म्हणजे त्यांच्या मुलानं रेल्वेकडं इन्श्युरन्ससाठी क्लेम केला. पण निराशा वाट्याला आली. " रेल्वे अधिका-यांकडे आम्ही गेलो होतो. पण अशाप्रकारचा अपघात रेल्वेच्या अपघातात येत नाही. असं सांगून त्यांनी मला गप्प बसवलं, " दशरथ शेवाळेंचा मुलगा दिनेश शेवाळे सांगत होता. तीन हॉस्पिटल फिरूनही शेवाळेंचे पाय मात्र बरे झाले नाहीयत. ऑक्टोबर 2007 पासून दशरथ शेवाळे घराबाहेर पडलेच नाहीयेत. त्यांचं छोटंसं घर हेच त्यांचं विश्व झालंय. रात्री 11 ते सकाळी 8 म्हणजे तब्बल नऊ तास दशरथ शेवाळे खाडीत पडून होते. त्यांच्याकडे नाही रेल्वेचं लक्ष गेलं... नाही पोलिसांचं. या नऊ तासात जर त्यांना वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांना आज व्हिलचेअरची गरज पडली नसती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2009 12:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2009 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close