S M L

मुझफ्फरनगर दंगलींवरून पवारांनी मोदींवर डागली तोफ

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2013 04:00 PM IST

Image sharad_pawar_on_fixing456346_300x255.jpg21 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर तोफ डागलीय.

 

उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये हिंदी-मुस्लीम एकतेचं वातावरण होतं. पण पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारे काही लोक सत्ता मिळवण्यासाठी जाणूनबुजून सामाजिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न करतायत असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय.

 

राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईतल्या वांद्रे इथं सर्वभाषी श्रमजीवी परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना पवार यांनी मोदी आणि भाजपचा उल्लेख न करता अप्रत्यक्ष हल्ला चढवला. स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरोधात संघर्षासाठी उभं राहायला हवं, असंही ते म्हणाले.

 

काय म्हणाले शरद पवार?

"काही लोकांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडतायत. आपल्याला जिथं पाठिंबा मिळत नाही तिथं सामाजिक अंतर वाढवल्याशिवाय सत्ता येणार नाही हा निष्कर्ष काढून एका प्रकारचं वेगळं वातावरण तयार केलं जात आहे. याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे. तसंच एका पक्षाचे राजकीय नेता उत्तरप्रदेशमध्ये आपल्याला अधिक जागा मिळवण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करतो. तिथल्या सरकार मधील विधायक आमदारालाही तशी भूमिका घ्यावी लागली. आणि म्हणून स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी, स्वत:च्या सत्तेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेकडो माणसाचा बळी गेला. लोकांची घरं उद्धवस्त झाली नसती, नवविवाहित महिला विधवा झाल्यात, अनेकांचे संसार उघड्यावर आले त्यामुळे अशी भूमिका घेऊन कुणी राजकारण करत असेल तर त्याच्याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि सामाजिक ऐक्यासाठी वाटेल ती किंमत द्यावी लागेल."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2013 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close