S M L

कृष्णा खोरे घोटाळ्याचा तपास अहवालच गायब

Sachin Salve | Updated On: Sep 23, 2013 03:28 PM IST

कृष्णा खोरे घोटाळ्याचा तपास अहवालच गायब

krushna project23 सप्टेंबर : दिल्लीत कोळसा घोटाळ्याच्या फाईल्स गहाळ होण्याचं प्रकरण गाजत असतानाच आता राज्यातही कृष्णा खोरे प्रकल्पातल्या घोटाळ्याचा तपास अहवाल गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे.

 

या घोटाळ्यात सर्वच पक्षांचे नेते अडकण्याची शक्यता असल्यानंच हे प्रकरण घडल्याची जोरदार चर्चा आहे. युतीच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या कृष्णा खोरे महामंडळात हजारो कोटी रूपयांचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर अँटीकरपश्न विभागाने चौकशी करून 1999 मध्ये हा अहवाल सरकारला दिला.

 

पण गेल्या 14 वर्षांमध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. आरटीआय कार्यकर्ते पोपट कुरणे यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी गेली वर्षभर प्रयत्न केली. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी झाली, तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीला आलीये. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहे.

माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी यासंदर्भात काय म्हटलंय?

कृष्णा खोर्‍याची बातमी सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेता माहिती देणं आवश्यक आहे. या प्रकरणात माहिती देण्याची टाळाटाळ झाल्याचं स्पष्ट होतंय. या सर्व प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य वाटते. या सर्व बाबी पाहता अँटी करप्शन ब्युरोनं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. अँटीकरप्शन ब्युरोच्या महासंचालकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत चौकशी अहवालासह हजर व्हावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 23, 2013 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close