S M L

ज्येष्ठ लेखक शं.ना.नवरे काळाच्या पडद्याआड

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2013 03:34 PM IST

ज्येष्ठ लेखक शं.ना.नवरे काळाच्या पडद्याआड

25 सप्टेंबर : आपल्या अनेकांची सकाळ शहाणी करणारे ज्येष्ठ लेखक शन्ना नवरे यांचं आज डोंबिवलीत वृध्दापकाळानं निधन झालं.ते 86 वर्षांचे होते. शंकर नारायण नवरे अर्थात वाचकांचे लाडके शन्ना यांनी फक्त कथा-कादंबर्‍यांपुरतंच आपलं साहित्यविश्व मर्यादित ठेवलं नाही.

 

पटकथा, नाटकं, लेखसंग्रह अशा अनेक साहित्य प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली. 21 नोव्हेंबर 1927 मध्ये त्यांचा जन्म झाला. साध्या-सरळ भाषेतून साध्या माणसाचं आयुष्य त्यांनी कथांमधून समोर आणलं. 'सुरूंग', 'संवाद', 'दिवसेंदिवस', 'नो प्रॉब्लेम', 'दिनमान' या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. तसंच 'कवडसे', 'शन्नाडे', 'झोपाळा', 'उनसावली'. 'झोका', हे त्यांचे ललित लेखसंग्रह वाचकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते.

 

शन्ना एक उत्तम नाटककारही होते. 'एक असतो राजा', 'नवरा म्हणून नये आपला', 'धुक्यात हरवली वाट', 'धुम्मस', 'सूर राहू दे', 'गुंतता ह्रदय हे','गहिरे रंग', 'गुलाम', 'हवा अंधारा कवडसा', 'वर्षाव', 'रंगसावल्या', 'गर्‌ँट रिडक्शन सेल', 'हसत हसत फसवुनी' अशी अनेक नाटकं रसिकांना आवडली होती. प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले शन्नांचं लिखाणही त्यांच्यासारखंच टवटवीत होतं. त्यांच्या लेखनातली पात्रं आपल्याला हसवायची, विचार करायला लावायची आणि अंतर्मुखही करायची..शन्नांच्या निधनानं मराठी साहित्याला कथांची नवीन ओळख करून देणारा कथाकार हरपलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2013 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close