S M L

शिंदेंविरोधात प्रतिज्ञापत्रासाठी CBI ला तीन आठवड्यांची मुदत

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2013 06:21 PM IST

Image img_184172_aadarsh_240x180.jpg26 सप्टेंबर : बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात झाली. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत आणखी एक प्रतिज्ञापत्र दाखल करयाचं असून त्याबाबत वेळ देण्यात यावा अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली आणि कोर्टाने सीबीआयला तीन आठवडयांची मुदत दिलीय.

 

याआधी सीबीआयनं शिंदे यांच्याबाबत एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यात शिंदे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याएवढे पुरेसे पुरावे नाहीत असं म्हटलं होतं.

 

दरम्यान, आदर्श प्रकरणात आरोप असलेल्या आय.ए.एस. अधिकार्‍यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी अशी याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज कोर्टात सुनावणी झाली. येत्या 17 ऑक्टोबरला याबाबतची पुढची सुनावणी होणार आहे. या अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2013 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close