S M L

नातवाच्या उपचारासाठी आजोबाची धडपड

1 फेब्रुवारी अकोलाप्रवीण मनोहर आपण श्वास चित्रपटातील नातवाच्या उपचारासाठी धडपडणारे आजोबा पाहिले असतील. त्याच प्रकारची अकोला जिल्ह्यातील एका आजोबाची धडपड चालू आहे ती आपल्या एचआयव्ही पॉझिटिव्ह नातवाच्या उपचारासाठी.बालपणात आईवडिलांच्या निधनानं पोरका झालेल्या शुभमला आधार आहेत त्याचे आजोबा. शुभमची ते जिवापाड काळजी घेतात. मोलमजुरी करून पोट भरणा-या आजोबांचही आता वय झालं आहे. त्यांना काळजी आहे ती शुभमच्या भविष्याची. शुभमचे आजोबा सांगतात, मी मेल्यावर शुभमकडे कोण लक्ष देइल. शुभम शाळेतही जातो. तसंच तो दर महिन्याला आपल्या आजोबासोबत एआरटी सेंटरमध्ये उपचारसाठी जातो. एआरटी सेंटरमध्ये उपचाराला आल्यापासून शुभमचं कमी झालेलं वजनही वाढलेलं आहे. डॉक्टर त्याला सकस आहार आणि नियमीत उपचाराचा सल्ला देतात. मात्र तो खर्च या थकलेल्या आजोबांसाठी कठीण झाला आहे. उपचार अभावी आपल्या नातवाच्या जीवाला बरवाईट तर होणार नाही ना, ही भीती त्यांना सतावतेय. आजोबांच्या हाती पैसा नसला तरी ते हिंमत हारलेले नाहीत. मोलमजुरी करून ते आज नातवाच्या उपचारासाठी धडपडत आहेत.त्यांना गरज आहेत ती समाजाच्या आपलेपणाच्या मदतीची.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2009 07:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2009 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close