S M L

मुनाफ पटेल भारतात परतणार

2 फेब्रुवारी मुंबईश्रीलंका दौ-यावर असलेल्या भारतीय टीमसाठी एक वाईट बातमी आहे. भारताचा फास्ट बॉलर मुनाफ पटेलने श्रीलंका दौ-यातून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे तो पुढची सीरिज खेळू शकणार नाही. पहिल्या वन डेमध्ये वॉर्मअप करत असताना त्याच्या डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला परत भारतात पाठवण्याचा निर्णय टीम व्यवस्थापनाने घेतल्याचंही कळतंय. त्याच्या जागी लक्ष्मीपती बालाजीची निवड करण्यात आली आहे. बालाजीने या मोसमात तामिळनाडूकडून चांगली बॉलिंग केली आहे. त्याच्या जागी धवल कुलकर्णी किंवा आर.पी. सिंगची निवड होईल असं बोललं जातं होतं. जर धवल कुलकर्णीला संधी मिळाली असती तर त्याला त्याचा फायदा झाला असता. पण निवड समितीने अनुभवी खेळाडूला संधी दिली. बालाजीही आता 5 वर्षानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. असं असलं तरी चेन्नई आणि श्रीलंकेतलं वातावरण जवळपास मिळतं जुळतं असल्यामुळे बालाजीला त्याचा जास्त त्रास होणार नाही त्यामुळे तो नक्की चांगली कामगिरी करेल याची आशा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2009 07:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2009 07:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close