S M L

बीडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Sachin Salve | Updated On: Sep 28, 2013 08:52 PM IST

Image img_226632_rape34534_240x180.jpg28 सप्टेंबर : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातल्या केसापुरीत एका विवाहितेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीये. ही महिला माहेरुन सासरी जात होती. पण वडवणी शहरात तिची चुकामुक झाली.

 

यावेळी ती एकटीचं निघाली असता सुखरुप घरी सोडतो असं सांगत जालिंधर तागडे यानं तीला शेतात नेऊन बलात्कार केल्याचा या महिलेचा आरोप आहे. दुसर्‍या दिवशी या नराधमानं तिला शेतातल्या 2 गड्यांच्या हवाली केलं आणि तो फरार झाला.

 

पण या प्रकरणानंतरही पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला. स्थानिक नागरिक आणि पत्रकारांच्या मदतीनं शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिन्ही आरोपी अजून फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2013 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close