S M L

किनार्‍याच्या सुरक्षेची जबाबदारी आता तटरक्षक दलाकडे

2 फेब्रुवारी, मुंबईअजित मांढरेसागरी किरनार्‍याच्या सुरक्षेची जबाबदारी तटरक्षक दलाकडं देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याआधी सागरी किनार्‍याच्या संरक्षणाची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे होती. केंद्रसरकारच्या ह्या निर्णयाचं राज्य सरकारकडून स्वागत करण्यात आलं आहे. राज्याला 720 किलो मिटरचा सागरी किनारा लाभलाय. या किनार्‍याच्या सरंक्षणाची जबाबदारी मुंबई पोलिसांकडं होती. त्यासाठी 12 सागरी पोलिस ठाणे आहेत. समुद्राकिनार्‍या पासून 12 नॉटीकल माईल्सपर्यंत मुंबई पोलिसांची हद्द होती. पण, ह्या समुद्र किनार्‍याचा वापर अंडरवर्लडनं अनेकदा केला. एवढंच नाहीतर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठीचं किनार्‍यांचा वापर करण्यात आला. आणि तोही दोनदा. त्यामुळे सागरी किनार्‍याच्या सुरक्षीततेचा प्रश्न दिवसंदिवस गंभीर बनत चाललाय. त्यामुळं आता सागरी किनार्‍याच्या सुरक्षेच्या जबाबदारी पासून मुंबई पोलिसांना मुक्त करून ती जबाबदारी तटरक्षक दलाकडे देण्यात आली.गृहमंत्री जयंत पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. "आजपर्यंत कोणत्याही राज्यात सागरी किनार्‍याची जबाबदारी पोलिसांकडे नव्हती. हे तटरक्षक दलाचं काम आहे. त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करू." असं ते म्हणाले.याआधी मुंबई पोलिसांकडं शुन्य ते 12 नॉटीकल पर्यंत सागरी किनार्‍याच्या सुरक्षेची जबाबदारी होती. तर 12 ते 200 किलो मिटर समुद्राच्या सुरक्षेची जबाबदीरी तटरक्षक दलाकडं आहे. आणि 200किमी पासून पुढच्या समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी नौदलाकडं आहे.26..11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला नंतर समुद्र किनार्‍याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. कारण ह्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांना किनार्‍याच्या सुरक्षेसाठी पुर्णत: सक्षम बनवण्याची चर्चा जोर धरू लागली होती. पण, त्यासाठी खर्च करण्यापेक्षा किनार्‍याच्या सुरक्षेची जबाबदारी तटरक्षक दलाकडे सोपवण्याचा रामबाण उपायचं सरकारनं शोधून काढला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2009 08:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2009 08:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close