S M L

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट, 8 लाख कर्मचार्‍यांचं वेतन बंद

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2013 03:36 PM IST

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट, 8 लाख कर्मचार्‍यांचं वेतन बंद

usa down01 ऑक्टोबर : अमेरिकेमध्ये 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच पाशिर्यल शटडाऊनचं संकट ओढवलंय. अध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडलेल्या 'ओबामाकेअर' या आरोग्यविषयक विधेयकाला रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाली नाही. यामुळे सरकारनं मांडलेलं बजेटही मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे सरकारकडे खर्चासाठी पैसा उरला नाही.

 

अमेरिकेत आर्थिक वर्ष 1 ऑक्टोबरला सुरु होतं. त्यामुळे बजेट मंजूर होण्यासाठी 30 सप्टेंबर हीच तारीख होती. परिणामी अमेरिकी सरकारला पार्शियल शटडाऊनला मान्यता द्यावी लागली. याचा फटका अमेरिकेतल्या सरकारी कर्मचार्‍यांना बसणार आहे. अमेरिकी सरकार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर खर्च करणार नाही. याचा फटका लाखो कर्मचार्‍यांना बसणार आहे. यामुळे तब्बल 8 लाख सरकारी कर्मचार्‍यांना वेतन मिळणार नाही.

 

मात्र, पोलीस, सैन्य, अग्निशमन दल, टपाल खातं, हवामान विभाग, वैद्यकीय सुविधा, हवाई वाहतूक यंत्रणा या सरकारी खर्चावर चालणार्‍या सेवा सुरू राहतील. मात्र, सरकारी खर्चाने सुरु असलेली नॅशनल पार्क्स, वस्तूसंग्रहालयं, आणि स्मारकं मात्र बंद ठेवली जातील. तसंच सुरू ठेवलेल्या सरकारी सेवांपैकी फक्त सैन्याच्या कर्मचार्‍यांचाच पगार सुरू राहणार आहे. तशा विधेयकावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी सही केलीये. इतर खात्याच्या कर्मचार्‍यांना काही काळ तरी वेतनाशिवायच काम करत रहावे लागेल. त्यामध्ये तुरुंगाच्या कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट

- अमेरिकी सरकारचा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर खर्च बंद

- लाखो कर्मचार्‍यांना फटका, 8 लाख सरकारी कर्मचार्‍यांचं वेतन बंद

- पोलीस, सैन्य, अग्निशमन दल, टपाल खातं, हवामान विभाग, वैद्यकीय सुविधा, हवाई वाहतूक यंत्रणा या सरकारी सेवा सुरू राहणार

- मात्र, सरकारी खर्चाने सुरु असलेली नॅशनल पार्क्स, वस्तूसंग्रहालयं, आणि स्मारकं बंद राहणार

- सरकारी सेवांपैकी फक्त सैन्याच्या कर्मचार्‍यांचाच पगार सुरू राहणार

- इतर खात्याच्या कर्मचार्‍यांना काही काळ तरी वेतनाशिवायच काम करावं लागणार

- तुरुंगाच्या कर्मचार्‍यांनाही पगार मिळणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2013 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close