S M L

आव्हाडांना उपोषण सोडायला सांगितलं नव्हतं -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2013 04:16 PM IST

आव्हाडांना उपोषण सोडायला सांगितलं नव्हतं -मुख्यमंत्री

cm on avhad08 ऑक्टोबर : ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटवरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी उपोषण करून आघाडीला घरचा अहेर दिला. मात्र आव्हाडांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी कुरघोडी केलीय.

 

आव्हाडांना उपोषण सोडण्यासाठी सांगितलंच नव्हतं. राष्ट्रवादी पक्ष हा आमचा सहकारी पक्ष आहे. जी काही धोरणं राबवायची असतात त्यासाठी दोघांच्या सहमतीने निर्णय घ्यावा लागतो. क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत मी विधिमंडळात आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ असा खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

 

मला उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं नाही तर शासनाने दिलं होतं मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून उदय सामंत आले होते. त्यांनी महिन्याभराची मुदत दिली म्हणून उपोषण सोडलं असं आव्हाडांनी उपोषण सोडण्यानंतर स्पष्ट केलं होतं.

 

तर दुसरीकडे या प्रश्नावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेनं आंदोलन करुन तातडीनं निर्णय घ्या असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केलं होतं आणि स्पर्धा सुरू झाली ती श्रेय घेण्याची.. सुरवातीलाच शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाजी मारली. तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी केली. प्रत्येक पक्षाने आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याचा दावा केला. मात्र, कुठलाही निर्णय घाईनं घेणार नाही. विधिमंडळात यावर जे आश्वासन दिलं होतं त्याच प्रमाणे निर्णय घेऊ असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केल्यानं या सर्वच दाव्यांमधला फोल पणा स्पष्ट झाला आणि सर्वच पक्षांना फक्त राजकारणातच रस असल्याचं स्पष्

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2013 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close