S M L

MCAच्या मैदानात रंगणार मुंडे विरुद्ध पवार सामना

Sachin Salve | Updated On: Oct 8, 2013 10:21 PM IST

Image munde_on_pawar4334_300x255.jpg08 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणुकीची रंगत आता चांगलीच वाढलीये. अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनीही उडी घेतलीये. त्यामुळे एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत पवार विरुद्ध मुंडे हा सामना बघायला मिळणार आहे.

 

गोपीनाथ मुंडेंनी आज अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. मी अनेक दिवस या निवडणुकीची तयारी करतोय. राजकीय हेतूने मी ही निवडणूक लढवत नाहीये. मैदानावर असलेल्या क्लब आणि एमसीएला मजबूत करणे आणि क्लबला सक्षम करणे हा माझा मुख्य हेतू आहे अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली.

 

मला राजकारणात क्रिकेट आणि क्रिकेट मध्ये राजकारण आणायचं नाहीये असंही ते म्हणाले. मुंडेच्या फॉर्मवर सूचक म्हणून आशिष शेलार यांनी तर अनुमोदक म्हणून सुभाष देसाई यांनी सही केली आहे. 18 ऑक्टोबर रोजी होणार्‍या या निवडणुकीत दोन गटांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिलाय. त्यामुळे एमसीएतील गणितं आता कशी होतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2013 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close