S M L

सहकार घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करा -अण्णा हजारे

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2013 03:47 PM IST

Image anna_on_shinde_300x255.jpg09 ऑक्टोबर : राज्यात 10 हजार कोटींचा सहकार घोटाळा झालाय आणि या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर धडक मोर्चा मोर्चा निघणार आहे. आझाद मैदानात सभेला सुरूवात झालीये.

 

मोर्चामध्ये राज्यभरातून हजारो ऊस उत्पादक शेतकरी, मजूर सहभागी झालेत. गेल्या 8 वर्षांत राज्यातले 40 सहकारी साखर कारखाने सरकारनं बेकादेशीरित्या विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि अण्णा हजारेंनी केलाय. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या संगनमतानं सहकारी साखर कारखान्यांचा कणा मोडल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

या घोटाळ्यात सहकारी साखर कारखान्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता विकली गेली. तसंच शेतकरी, सभासद आणि कामगारांचे सुमारे 800 कोटी रुपयेसुद्धा बुडवले गेलेत. या संपूर्ण घोटाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप आरोप माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केलाय. दरम्यान, आपण फसवणूक करून कारखाना ताब्यात घेतलेला नाही, असा खुलासा भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2013 03:43 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close