S M L

महिलांवरच्या लाठीमारानंतर नांदेडमध्ये तणाव

3 फेब्रुवारी, नांदेडसंदीप काळेनांदेडमध्ये काल आंदोलक महिलांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर तणाव निर्माण झालाय. लाठीमारानंतर संतप्त झालेल्या जमावानं रात्री उशिरा डीवायएसपी राजकुमार शिंदे यांची गाडी फोडली. याप्रकरणी आज सात जणांना अटक केलीये. तर लाठीमारात जवळपास पंचवीस जण गंभीर जखमी झालेत. यात काही महिलांचाही समावेश आहे. " नांदेडमध्ये दारुबंदी व्हावी असं वाटतंय. म्हणून आम्ही पुढे आलो. पण पोलिसांनी आम्हाला उलटा प्रसाद दिला. " असं पोलिसांच्या लाठीमारानं त्रस्त झालेल्या महिला जमुना पवार म्हणाल्या. ' पोलिसांना अशी महिलांना मारहाण करणं शोभतं का, असा प्रश्नही जमुना पवार या आजीबाईंनी विचारला आहे. गावात दारुबंदी असावी म्हणून ग्रामसभेत महिलांनी मतदान केलं. पण तिथे घोळ झाला. कारण मतदान कमी झालं. त्यामुळे गावातल्या महिला ह्या चांगल्याच संतापल्या होत्या. महिलांच्या बाजूनं पोलिसांनी उभं रहायचं सोडूनआपल्यावरच काठी चालवली, असा या महिलांचा आरोप आहे. मात्र पोलिसांना तो मान्यच नाहीये. " आम्ही लाठीचार्ज केली केला नाही, " असं डी.वाय.एस.पी राजकुमार शिंदे यांचं म्हणणं आहे. एवढं होऊही गावात दारुबंदीचा ठराव झाला की नाही, हे तहसिलदारांना माहीतच नाही. पोलिसांनी केलेला हा लाठीचार्जचा प्रकार पाहून, महिला अधिकच आक्रमक झाल्या. आणि त्यांनी याचा जाब विचारत इथल्या बिडिओलाच एका खोलीत कोंडलं आणि नंतर रास्ता रोको करून, आंदोलन केलं.अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त करणार्‍या दारूच्या बंदीसाठी महिलांनी एकत्र यावं. आणि या विधायक कामासाठी त्यांनाच लाठ्या खाव्या लागाव्यात आणि तेही चक्क मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे नक्कीच खेदजनक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 3, 2009 04:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 3, 2009 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close