S M L

बोरिवलीत परिस्थिती निवळली

4 जानेवारी, मुंबईवेस्टर्न रेल्वे लाईनवर बोरीवली ते विरार दरम्यानची ठप्प झालेली वाहतूक आता सुरळीत झाली आहे. विरार ते चर्चगेट अप अँड डाऊन मार्गावरची रेल्वे वाहतूक आता सुरळीत झाली आहे. बोरीवली रेल्वेस्थानकावर संतप्त रेल्वेप्रवाशांनी रेल रोको केल्यानं दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. प्लॅटफॉर्म नंबर एक, दोन आणि तीनवरून विरारला जाणार्‍या गाड्या सुटतात. त्यामुळे बोरीवलीच्या लोकांना प्लॅटफॉर्म नंबर सात आणि आठवरून चर्चगेटच्या गाड्यांमध्ये चढावं लागतं. त्यामुळे प्रवाशांना होणार्‍या त्रासाच्या विरोधात हा रेल रोको करण्यात आला .वेस्टर्न रेल्वे लाईनवर बोरीवली ते विरार दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. बोरीवली रेल्वेस्टेशनवर संतप्त प्रवाशांनी रेल रोको केल्यानं दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. आज सकाळी तांत्रीक कारणामुळं बोरीवलीहून चर्चेगटकडे जाणारी एक लोकल रद्द करण्यात आली. त्याचवेळी विरारकडे जाणार्‍या गाड्या सुरू होत्या. त्यानंतर मात्र चर्चेगेटला जाणार्‍या गाडीच्या मागणीसाठी संतप्त रेल्वेप्रवाशांनी रेल रोक सुरू केला. प्लॅटफॉर्म नंबर एक, दोन आणि तीनवरून विरारला जाणार्‍या गाड्या सुटतात. त्यामुळे बोरीवलीच्या लोकांना प्लॅटफॉर्म नंबर सात आणि आठवरून चर्चगेटच्या गाड्यांमध्ये चढावं लागत असल्याच्या विरोधात हा रेल रोको करण्यात आला. यामुळं रेले रोकोमुळं बाहेरगावी जाणार्‍या गाड्याही खोळंबल्या आहेत. दरम्यान भाईंदर आणि मीरारोडहून जाणार्‍या बेस्टच्या बसेसही प्रवाशांनी तुडंूब भरून जात आहेत. बोरिवली हे एक महत्त्वाचं रेल्वेस्थानक आहे. दररोज हजारो प्रदोन्ही बाजूच्या गाड्या बंद आहेत. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. सर्व प्रवासी ट्रॅकवर उभे आहेत. "आम्हाला प्लॅटफॉर्मवर गाड्यांची वाट पहात उभं रहावं लागतं. एवढे प्लॅटफॉर्म क्रॉस करूनही अनेक वेळा गाड्या लेट असतात, कॅन्सल होतात. खूप तक्रारी करूनही फरक पडला नाही. म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं." असं प्रवाशांनी सांगितलं. चर्चगेटला जाणार्‍या ट्रेन्स प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 किंवा 3 वरून सोडाव्यात तसंच चर्चगेटच्या लोकल्स कॅन्सल करू नयेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 06:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 06:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close