S M L

विमानप्रवास झाला स्वस्त

4 पेब्रुवारी, दिल्लीअतुल मिश्राविमान आणि रेल्वे यापैकी स्वस्तात होणारा प्रवास कोणता याचं उत्तर बहुतेकजण ट्रेनचा प्रवास असं देतील. पण आता दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता सारख्या काही मार्गांवर विमानाचे दरही ट्रेनइतकेच स्वस्त झाले आहेत. हवाई इंधन स्वस्त झाल्यामुळे साहजिकच हा परिणाम दिसतोय आणि विमानप्रवासाचे दर अजून कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-चेन्नई आणि दिल्ली-बंगळुरू असा प्रवास करायचा असेल तर विमानप्रवास ट्रेनपेक्षा स्वस्त पडू शकतो. गेले काही दिवस स्पाइसजेट आणि इंडिगोसारख्या बजेट एअरलाईन्सनी तिकीटांचे दर घटवले आहेत. त्यामुळे हा प्रवास ट्रेनपेक्षा 25 ते 48 टक्के किफायतशीर झालाय. 31 जानेवारीला हवाई इंधनाच्या दरांमध्ये घट झाली. आता हवाई इंधनाचे हे दर जवळपास दोन हजार पाच साली असणार्‍या दरांएवढे घसरले आहेत. आणखीही दरकपात होऊ शकेल असं तज्ज्ञांना वाटतंय. तुम्हांला राजधानी एक्स्प्रेसच्या फर्स्टक्लास एसी कोचनं दिल्लीहून मुंबईला जायचं असेल तर तिकीट लागेल सुमारे 3,300 रुपये. पण स्पाईलजेट एअरलाईन्सनं तुमचा हाच प्रवास फक्त 2,330 रुपयात होईल. तेही सर्व टॅक्ससहीत. इंडिगोचं तिकीट सर्व टॅक्ससमवेत पडेल 2,340 रुपयांना. राजधानी एक्स्प्रेसच्या सेकंडक्लास एसी कोचसाठी तिकीट आहे 1,975 रु. तर याच प्रवासासाठी स्पाइस जेटचं तिकीट मिळेल 2,330 रुपयांना आणि इंडिगोचं तिकीट आहे 2,340 रुपयांना. म्हणजेच ट्रेनच्या तिकीटाच्या पैशात थोडेसे अधिक पैसै टाकले तर आरामात विमानप्रवास होऊ शकतो. तसाही एअरलाईन्स सेक्टरसाठी फारसा काही तेजीचा काळ नाहीये तेव्हा विमानाच्या तिकीटदरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 08:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close