S M L

जेजे हास्पिटलचं ऑपरेशन थिएटर अत्यवस्थ

4 फेब्रुवारी, मुंबईप्रविण मुधोळकरमुंबईतील सर जेजे हॉस्पिटल तिथल्या सोयींसाठी प्रसिद्द आहे. राज्यभरातून अनेक लोक जेजे मध्ये उपचारासाठी येत असतात. पण जेजेमधील कार्डियोलॉजी विभागात इमारतीचे काम सुरु असतांनाही ऑपरेशन करणे चालू आहे.सर जेजे हॉस्पीटल मधील थिएटर आशियातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर आहे. कार्डिऑलॉजी अर्थात हृद्‌यरोगाचे ऑपरेशन इथे केले जातात. कुठल्याही ऑपरेशन थिएटर मध्ये एअर कंडिशन्ड स्थितीत आणि जंंतुसंसर्ग कुठल्याही प्रकारे येउ नये याची काळजी घेतली जाते. पण इथे तर मोठ भगदाड पाडलेली आणि ओलावलेल्या, बुरशी आलेल्या भिंतीमध्येच ऑपरेशन पार पाडण्यात आली आहेत.मंगळवारी पंधरा रुग्णांवर याच परिस्थीत शस्त्रकीया करण्यात आल्या. आजही एवढ्याच रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. अशा वातावरणात शस्त्रक्रीया करणे म्हणजे रुग्णांच्या जीवांशी खेळ करण्यासारखा आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार कुठल्याही ऑपरेशन थिएटर मध्ये माइक्रो जर्मस अर्थात सुक्ष्म जिवाणूही जाउ नये याची काळजी घ्यावी लागते. पण जेजेच्या कार्डियोलोजी विभागात धुळीच्या विळख्यातच पेशंंटवर ऑपरेशन करण्यात येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये कार्डियाक विभाग आहे. यात केईएम, सायन आणि नायर या तीन हॉस्पीटलचा समावेश आहे. यात केईएमच्या कार्डियोलॉजी विभागाचे नुतनिकरण करतांना ऑपरेशन थिएटर बंद ठेवण्यात आले होतं . पण जेजे मध्ये इमारत दुरुस्तीचे काम करण्याचे काम सुरु असतांना रुग्णांवर ऑपरेशन करण्याचा अट्टाहास का हेच कऴत नाहीये. रुग्णांच्या जीवाशी खेळ करताना, डॉक्टरांबरोबरच, जेजेच्या प्रशासनालाही परिस्थितीचं गांभीर्य वाटत नाही का ? हाच प्रश्न वारंवार समोर येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 08:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close