S M L

MCAच्या निवडणुकीअगोदरच मुंडे आऊट, पवार बिनविरोध?

Sachin Salve | Updated On: Oct 12, 2013 11:05 PM IST

Image munde_on_pawar4334_300x255.jpg12 ऑक्टोबर : एमसीएच्या निवडणुकीत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना धक्का बसलाय. गोपीनाथ मुंडे यांनी भरलेले निवडणुकीचा अर्ज हा अवैध ठरवण्यात आला आहे त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून मुंडे बाहेर पडले आहे.

 

एमसीएच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा मुंबईतला रहिवासी असावा लागतो मात्र मुंडेंचं मुंबईत कायमस्वरुपी वास्तव्य नसल्यामुले अर्ज अवैध ठरवण्यात आलाय. मात्र मुंडे यांनी आपला अर्ज अवैध नसून वैध आहे. यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त केलाय आणि याविरोधात अपील करणार असल्याचं मुंडेंनी सांगितलं. जर मुंडेंचा अर्ज अवैध ठरला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्षपदावर बिनविरोध निवडून येतील हे स्पष्ट आहे.

 

 

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी अर्ज भरल्यामुळे निवडणुकीला रंगत आली होती. कारण एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत पवार विरुद्ध मुंडे हा सामना बघायला मिळणार होता. मुंडेंनी अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला होता. मात्र आज मुंडेंचा अर्ज अवैध ठरल्यामुळे पवारांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झालाय. शरद पवार यांना बाळ म्हाडदळकर गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. त्यांनी 9 ऑक्टोबर रोजी आपला अर्जही दाखल केला. पवारांचा मार्ग मोकळा होण्यासाठी विजय पाटील गटानं पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे म्हाडदळकर गटाकडून आशिष शेलार यांनी निवडणुकीतून माघार घेऊन गोपीनाथ मुंडेंना छुपा पाठिंबा दिला.

 

 

मात्र मुंडेंनी आपला अर्ज अवैध नसून वैध आहे. मी गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत राहतोय, माझा मुंबईत फ्लॅट आहे. अर्जावरही मुंबईचा पत्ता आहे. मात्र माझा अर्ज अवैध कसा ठरला याबद्दल मलाही आश्चर्य आहे. आज शरद पवारांना एका पत्रकार परिषेदत एमसीएच्या निवडणुकीत मुंडेंनी अर्ज भरला असा सवाल विचारला होता त्यावर पवारांनी मला याची चिंता नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांना याची चिंता नाही म्हणजे त्यांना अगोदर हे माहित होते की माझा अर्ज अवैध ठरणार असा संशयही मुंडेंनी बोलून दाखवला. या सर्व प्रकारविरोधात आपण हायकोर्टात अपील दाखल करणार असल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2013 10:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close