S M L

शिवसैनिकांनी दाखवला सरांना घरचा रस्ता

Sachin Salve | Updated On: Oct 13, 2013 09:54 PM IST

शिवसैनिकांनी दाखवला सरांना घरचा रस्ता

manhoar joshi walkout13 ऑक्टोबर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यामुळे आज त्याचे तीव्र पडसाद दसरा मेळाव्यात उमटले. व्यासपीठावर मनोहर जोशी पोहचल्यानंतर शिवसैनिकांना 'मनोहर जोशी हाय हाय, मनोहर जोशी खाली उतरा' अशी घोषणाबाजी करून एकच गोंधळ उडवून दिला.

 

मनोहर जोशी काही काळ व्यासपीठावर बसले. मात्र शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरूच राहिली. उद्धव ठाकरे, सेनेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र घोषणाबाजी सुरूच राहिल्या अखेर जोशींनी व्यासपीठावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. जोशी व्यासपीठावरून उतरून घरी निघून गेले.

 

मात्र माझा कुणावरही राग नाही, मी एक शिवसैनिक असून शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरे माझ्यावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी बसून जोशी सरांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. मात्र आजच्या मेळाव्यातून जोशींना व्यासपीठावरून खाली उतरण्याची नामुष्की ओढावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2013 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close