S M L

विनोद कांबळीची राजकीय इनिंग सुरू

4 फेब्रुवारी मुंबईक्रिकेटर विनोद कांबळी आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. विनोद कांबळीनं राजकारणात प्रवेश केला आहे. आमदार कपिल पाटील यांच्या लोकभारती या राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा त्यानं केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यानं ही माहिती दिली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं आपण व्यथित झालो आणि त्यानंतरच राजकारणात उतरण्याचा आपण निर्णय घेतल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. तळागाळातील लोकांसाठी काम करणार असल्याचं सांगत त्यानं स्पोर्ट्स आणि शिक्षण क्षेत्रात विशेष काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. पण इतक्यात निवडणूक लढवण्याचा आपला विचार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. याचबरोबच आपल्या प्रस्तावित स्पोर्ट्स अकादमीच्या भावी योजनांविषयीही त्यानं यावेळी माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 01:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close