S M L

सायन हॉस्पिटलच्या कर्मचा-यांच्या निलंबनाला स्थगिती

4 फेब्रुवारी मुंबईसायन हॉस्पिटलमधून 1 जानेवारीला चोरीला गेलेलं अर्भक अद्याप सापडलेलं नाही. मुलाचे पालक मोहन आणि मोहिनी नेरुरकर यांनी मुंबई हाय कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी सुरू आहे. आज पोलीस कमिशनर हसन गफूर कोर्टात हजर झाले. या अभ्रक चोरीमध्ये रॅकेटचा हात असावा, असा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. मूल चोरी प्रकरणाला जबाबदार ठरवून हॉस्पिटलमधल्या डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्या कारवाईला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी नायर हॉस्पिटलच्या डीनच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येईल अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी कोर्टात दिली. समिती येत्या 10 दिवसात आपला अहवाल सादर करेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 11:11 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close