S M L

विठ्ठलाचा गाभारा सोन्याने मढवणार

Sachin Salve | Updated On: Oct 15, 2013 06:31 PM IST

Image img_189032_vithalala_240x180.jpg15 ऑक्टोबर : वारकर्‍यांचा आणि गरिबांचा देव म्हणजे विठ्ठल...आता विठ्ठलाचा गाभारा सुवर्णाकीत होणार आहे. विठ्ठल मंदिराचा गाभारा सोन्याने मढवण्याबाबत मंदिर समितीनं निर्णय घेतलाय.

 

काल मंदिर समिती, एम.आय.टी.चे विश्वनाथ कराड आणि वारकर्‍यांची एक बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. एम.आय.टीनं याबाबत पुढाकार घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. भक्तांनी दिलेलं दान आणि दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

 

मात्र मंदीर समितीच्या या निर्णयाला वारकर्‍यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. गरिबांचा देव असलेल्या विठ्ठलाच्या मंदिराला सोन्यानं मढवण्यापेक्षा पंढरपूरमध्ये पायभूत सुविधा निर्माण करून परिसरातल्या स्वच्छतेकडे लक्षं द्यावं असं वारकर्‍यांच म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2013 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close