S M L

हिरानंदानींनी पत्रकार परिषदेतून पळ काढला

4 फेब्रुवारी मुंबईबिल्डर हिरानंदानी यांना स्वतःच्याच पत्रकार परिषदेतून पळ काढावा लागला आहे. प्रसिद्ध बिल्डर हिरानंदानी यांना 2 हजार कोटी रुपयांचा दंड बसणार अशा आशयाची बातमी मुंबईतल्या एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली, त्यानंतर याचं स्पष्टीकरण देण्यासाठी हिरानंदानी यांनी पत्रकार परिषद घेतली. पण या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना निरंजन हिरानंदानी यांनी पळ काढला. मुंबईतल्या पवई भागातल्या हिरानंदानी डेव्हलपर्सची काही जमीन सेझसाठी राखीव केलेली आहे. पण निरंजन हिरानंदानी यांनी न्यायालयात केलेल्या ऍफिडेव्हीटमध्ये अशाप्रकारे जमीन दिली नसल्याचं म्हंटलंय. त्यामुळे काही दिवस हा मुद्दा वादग्रस्तरित्या चर्चेत आहे. या सगळ्याच्या स्पष्टीकरणासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मात्र हिरानंदानी यांना पळता भूई थोडी झाली. या पत्रकार परिषदेत हिरानंदानी यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गरिबांसाठी आपण 5 हजार घराचं वाटप केल्याचं सांगितलं. पण नंतर पत्रकारांच्या प्रश्नांपुढे ते गडबडले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 05:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close