S M L

उद्धव यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती अटळ, राणेंचा प्रहार

Sachin Salve | Updated On: Oct 16, 2013 09:34 PM IST

उद्धव यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती अटळ, राणेंचा प्रहार

rane on sena16 ऑक्टोबर : मनोहर जोशी यांनी व्यासपीठावर येणं, त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करणं आणि यामुळे जोशी अपमानित होऊन व्यासपीठावरून पायउतार होणं हे सगळं उद्धव ठाकरे यांचं कारस्थान होतं. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे अधोगतीला जातेय अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे एकेकाळचे नेते नारायण राणे यांनी केलीय. तसंच मनोहर जोशी यांनी आपल्या चातुर्याने, कटकारस्थानं करून अनेकांना शिवसेना सोडायला भाग पाडलं आणि म्हणून नियतीने त्यांच्यावर उगवलेला हा सूड आहे अशी खोचक टोलाही राणे यांनी लगावला. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत राणे यांनी शिवसेनेवर 'प्रहार' केला.

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना अपमानित होऊन पायउतार व्हावे लागले. आज सेनेच्या मुखपत्रातून जोशी सरांना कानपिचक्या देण्यात आल्यात. तर दुसरीकडे शिवसेनेचे एकेकाळचे नेते नारायण राणे यांनी घडलेल्या प्रकारावर चांगलाच 'प्रहार' केला. मनोहर जोशी यांनी आपल्या चातुर्याने, कटकारस्थानं करून अनेकांना शिवसेना सोडायला भाग पाडलं आणि म्हणून नियतीने त्यांच्यावर उगवलेला हा सूड आहे. शिवसेना पक्ष म्हणून पक्षप्रमुखांच्या उपस्थित पायउतार व्हावं लागतं हे दुर्देवी आहे.

 

लोकसभेचे सदस्य, माजी मुख्यमंत्री अशी अनेक पद भुषवणारे जोशी यांना अशा पद्धतीने अपमानित करणं योग्य नव्हतं. जोशी मंचावरून खाली उतरत असताना त्यांना थांबवायला हवं होतं. शिवसैनिक घोषणा देत होते त्यावेळी उद्धव यांनी सैनिकांना तंबी दिली पाहिजे होती पण शेवटी उद्धव यांनी तसं केलं नाही. घोषणा देणारे हे उद्धव यांचीच माणसं होती. आजपर्यंत अनेकांना ज्या पद्धतीने शिवसेनेचा बाहेरचा रस्ता दाखवला तीच पद्धत त्यांनी आताही वापरली. आणि त्यामुळे मनोहर जोशी यांना पायउतार होताना थांबवलं नाही. एकंदरीत या सगळ्या प्रकावरून उद्धव यांनी रचलेलं हे कारस्थान होतं आणि हे पूर्वनियोजित होतं अशी टीका राणे यांनी केली.

 

तसंच उद्धव आणि जोशी सरांचा हा 'स्टेज शो'असल्याची शक्यता ही त्यांनी फेटाळून लावली. जोशी सरच काय तर कोणताही नेता आपला अपमान करून घेण्यासाठी स्टेजवर आलाच नसता. पण उद्धव यांनी ज्यापद्धतीने ही सगळी खेळी खेळली ती चुकीची होती. त्यांच्या अशा वागण्यामुळे शिवसेनेचे नेते कमी होतील. आणि नवीन नेते कोणी शिवसेनेकडे येणार नाही. असं जर चालत राहिलं तर सेनेची ताकद कमी होईल. साहेबांनी माणसं घडवली,मोठी केली, माणसं टिकवली आणि त्यांचा योग्य वापर केला विश्वासाने केला आणि प्रेमानेही केला. पण हे स्कील उद्धव ठाकरे राबवत असल्याचं दिसत नाही. किंवा तसा वापर करताना दिसत नाही. साहेबांनी एवढी वर्ष सत्तेत राहून किंवा सत्तेबाहेर असून कुठल्याही माणसाला सेनेतून बाहेर काढलं नाही. किंवा प्रवृत्त केलं नाही. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेवरची त्यांची पकड घट्ट होत नाहीय आणि होणारही नाही. उद्धवच्या कार्यपद्धतीमुळे सेना अधोगतीला जातेय अशी बोचरी टीकाही राणे यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2013 09:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close