S M L

मालेगाव बॉम्बस्फोटाशी शिवसेनेचा संबंध ?

5 फेब्रुवारी, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात एका शिवसेनेच्या नेत्याचाही समावेश होता. बॉम्बस्फोटाच्या आरोपपत्रात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. एटीएसच्या या गौप्यस्फोटामुळं खळबळ उडालीय. कटाच्या बैठकांनाही हा नेता हजर होता अशी माहिती एटीएसनं आरोपपत्रात दिलीय. पण या नेत्याचं नाव उघड करण्यात आलेलं नाही. यामुळे शिवसेनेचा हा नेता कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे.1 नोव्हेंबर 2008... शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामना मध्ये पहिल्यांदा मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावर टीका झाली. त्यापूर्वी 26 ऑक्टोबरला साध्वी प्रज्ञा सिंगला अटक झाली होती. पण आरएसएस वा भाजपनं साध्वीशी आपला काही संबंध नाही अशीच भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या एटीएस विरोधी मोहिमेनंतर संघपरिवारानं साध्वी आणि शंकराचार्य स्वामी अमृतानंद उर्फ दयानंद पांडेच्या पाठिंब्यासाठी मोहिम छेडली. शिवसेनेनं मालेगाव बॉम्बस्फोट तपासाबाबत का ओरड केली त्याचं उत्तर आता आरोपपत्रातून मिळतंय.एका साक्षीदाराचा जबाब या आरोपपत्रात आहे. इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या असिस्टंटचा हा जबाब आहे. 2007 साली नाशिक जवळच्या देवळाली इथं लेफ्टनंट कर्नल पुरोहितनं एक बैठक घेतली. त्या बैठकीला हा साक्षीदार हजर होता. त्यावेळेस पुरोहितनं एका व्यक्तीची ओळख शंकराचार्य उर्फ दयानंद पांडेशी करुन दिली. ती व्यक्ती शिवसेनेचा संस्थापक आहे, असं पुरोहितनं दयानंद पांडेला सांगितलं. भाजपचे माजी खासदार बी एल शर्मा हेही या बैठकीला हजर होते. या बैठकीत मुस्लिमांविरोधात मोठा धमाका झाला पाहिजे याची चर्चा झाली. त्यासाठी काही तरुणांना ट्रेनिंग दिलं जातंय असंही बैठकीत सांगितलं गेल्याचं निनाद बेडेकर यांच्या या असिस्टंटनं जबाबात सांगितलंय. एटीएसनं आपल्या विरोधात फार चौकशी करु नये यासाठीच शिवसेनेनं आटापिटा केला. मालेगाव बॉम्बस्फोट तपासाविरोधात शिवसेना कोर्टात गेली हेमंत करकरे यांची धिंड काढली जाईल,असा इशारा सामनातून देण्यात आला.1 डिसेंबर 2008 रोजी महाराष्ट्र बंदची हाक शिवसेनेनं दिली. पण करकरेंच्या वीरमरणानंतर हा बंद मागे घेण्यात आला.मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपपत्रामुळं एक उघड झालंय की हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा कट काही व्यक्तींपुरता मर्यादित नव्हता. आता त्याचे राजकीय लागेबंधही समोर येऊ लागले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 05:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 05:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close