S M L

कुंभमेळ्याच्या 2,380 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2013 09:43 PM IST

कुंभमेळ्याच्या 2,380 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

nashik kumbha mela17 ऑक्टोबर : नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुभमेळासाठी च्या प्रस्तावीत दोन हजार 380 कोटी रुपयांच्या आराखडयाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिलीय.

 

यात सिंहस्थासाठी अधिक निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांच शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार आहे. कुंभमेळा नियोजनासाठी नेमलेल्या शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली.

 

 

यात नाशिकचे पालकममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर.आर.पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोेरात, सतेज पाटील, उपस्थित होते. 2015 मध्ये हा सिंहस्थ कुंभमेळा होणार असून याचा आराखडा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सादर केला. या मेळाव्यासाठी एक कोटी भाविक उपस्थित राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2013 09:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close