S M L

तोरणा किल्ल्यावर ट्रॅकिंगला गेलेली पुण्यातली दोन मुलं बेपत्ता

5 फेब्रुवारी, पुणेतोरणा किल्ल्यावर ट्रोकिंगसाठी गेलेले पुण्यातील दोन तरूण रविवार पासून बेपत्ता आहेत. पोलीस, लष्कराचे जवान, स्थानिक नागरिक तसंच काही ट्रेकर्स त्यांचा शोध घेताहेत. मुलांचा शोध न लागल्यानं त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत.पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारे दोन तरूण शोर्य गर्ग आणि सागर संघवी रविवारी ट्रेकिंगसाठी या परिसरात आले होते. पण सोमवारी ते कामावर न परतल्यानं कंपनीतील त्यांच्या मित्रांनी बेपत्ता असल्याची तक्रार वेल्हे पोलिस स्टेशनला दाखल केली. तेव्हापासून त्यांचा शोध पोली घेत आहेत.रविवारी सकाळी 10च्या सुमारास वाट चुकलेल्या अवस्थेत दोन तरुण पाहिल्याचं या महिलेनं पोलिसांना सांगितलंय. स्थानिक नागरिक, पोलिस आणि लष्कराचे जवान या दोघांचा कसून तपास करत आहेत. हेलिकॉप्टरचीही मदत यावेळी घेण्यात आलीय. पण प्रयत्न व्यर्थ ठरलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 08:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 08:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close