S M L

हा मार्ग धोक्याचा - कोपर रेल्वेस्थानक बनलंय मृत्यूचा सापळा

5 फेब्रुवारी, ठाणे अजित मांढरेडोंबिवली आणि दिवा दररम्यान रेल्वे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळं, प्रवाशांच्या सोयीकरता कोपर रेल्वे स्थानक बांधण्यात आलं. कोपर हे डोंबिवलीच्या आधीचं स्टेशन. पण, अजूनही ते अपूर्णच आहे. या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी फक्त एकच क्रॉसिंग ब्रीज आहे. त्यामुळे कोपर रेल्वे स्थानकावर जाणं एवढं सोपं नाहीये. प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते. अनेकवेळा प्रवासी रेल्वेरूळ क्रॉस करून, रेल्वेस्थानक गाठतात. आणि त्यातच आतापर्यंत बर्‍याच जणांना आपला जीव गमवावा लागलाय. कोपरवासीयांकरिता रेल्वे प्रशानानं कोपर रेल्वे स्थानक बांधलं. पण, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं अशी परिस्थिती ह्या रेल्वे स्थानकाची झालीय. कारण पूर्वेकडील प्रवाशांना रेल्वे स्थानकावर येण्याकरता क्रॉसिंग ब्रीजचं नाही. त्यामुळं अनेक प्रवासी आपल्या जीव धोक्यात घालून रोज हा रेल्वे रूळ क्रॉस करतात. कोपर रेल्वेस्थानकातून प्रवास करणा-या कित्येक प्रवासी आपल्या प्रवाशाच्या समस्येबद्दल रेल्वे प्रशासनाला सांगून सांगून थकले. पण सगळं काही व्यर्थच. गेल्या महिन्याभरात या ठिकाणी 10 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. क्रॉसिंग ब्रीज बांधावा यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनंही केलीत. पण, त्याच काहीच फायदा झाला नाही. तर कोपर रेल्वे स्थानकातला मृत्यूचा फास दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 09:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close