S M L

ठाण्यात मृतदेहांच्या नशिबी आल्यायत वेदना

5 फेब्रुवारी, ठाणेमनोज देवकर माणसाच्या जीवनात वेदनांचा अंत म्हणजे मृत्यू..पण मृत्यूनंतरही माणसाला वेदना भोगाव्या लागतात का, हा प्रश्न तसा श्रद्धेचा प्रश्न आहे. पण ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये तरी मृतदेहांच्या नशिबी वेदना भोगण्याचं दुदैर्व आलंय. मृतदेह ताब्यात घ्यायला कुणीही आलं नाही म्हणून गेल्या एक वर्षापासून नऊ मृतदेह इथं पडून आहेत. ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये भिवंडीतल्या एका व्यक्तीचा मृतदेह आहे. 24 सप्टेंबर 2007 ला या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पण कुणीही त्यांचा मृतदेह ताब्यात घ्यायला न आल्यानं गेल्या वर्षभरापासून त्यांचा मृतदेह पडून आहे. असेच आणखी नऊ मृतदेह गेल्या वर्षभरापासून इथं पडून आहेत. या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी रूग्णालय प्रशासन आता पोलिसांच्या परवानगीची वाट पहातंय. सिव्हिल हॉस्पिटलमधल्या मृतदेहांवर 15 दिवसांच्या आत अंत्यसंस्कार झाले पाहिजेत असा नियम आहे. पण पोलिसांनी हद्दीचं कारण देत जबाबदारी झटकलीये तर रूग्णालय प्रशासन त्यांच्यापरवानगीची वाट पहातेय. हे मृतदेह सडून गेल्यानं हॉस्पिटलमध्ये असलेल्या इतर पेशंट्सच्या तब्बेतीलाही यामुळे हानी पोहोचू शकते. याचाही विचार प्रशासनानं केलेला दिसत नाही. माणसाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले तरच त्याला मुक्ती मिळते असं मानलं जातं. पण सरकारी कारभारामुळं या मृतदेहांना मुक्ती कधी मिळणार हा प्रश्नच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2009 11:56 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2009 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close