S M L

कोल्हापुरात टोलविरोधात महापदयात्रा

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2013 04:23 PM IST

कोल्हापुरात टोलविरोधात महापदयात्रा

kolhapur toll26 ऑक्टोबर : कोल्हापुरकरांनी आज पुन्हा एकदा टोलविरोधात रणशिंग फुंकलंय. आज शहरातल्या मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांनी टोलविरोधात महापदयात्रा काढून टोलला विरोध दर्शवला.

 

शिवाजी विद्यापीठापासून ते ताराराणींच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी या पदयात्रेचं आयोजन केलं होतं.

 

या पदयात्रेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. महिलांचाही यात मोठा सहभाग होता. त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा 'देणार नाही टोल आम्ही देणार नाही ' ही घोषणा पहाटेच ऐकायला मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2013 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close