S M L

राज भडकले, परवानगी शिवाय कुणाच्याही सेटवर जाऊ नका !

Sachin Salve | Updated On: Oct 28, 2013 07:48 PM IST

Image raj_on_thane_band_300x255.jpg28 ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केलीय. यापुढे पदाधिकार्‍यांच्या लेखी परवानगी शिवाय कुणीही चित्रपटांच्या सेटवर जाऊ नये अशी तंबीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भरलीय.

 

राज कुंद्रांच्या सेटवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी तोडफोड केली होती. यामुळे राज ठाकरेंनी मनचिसेच्या पदाधिकार्‍यांची आज बैठक घेतली.

 

मनचिसेच्या युनियनच्या सभासदांना डावलून शिवसेना युनियनच्या सभासदांना काम दिलं म्हणून कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी या विरोधात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2013 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close