S M L

'बाभळी'चे 'काटे' दूर

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2013 09:04 PM IST

'बाभळी'चे 'काटे' दूर

bhabhali29 ऑक्टोबर :  बहुचर्चित बाभळी बंधार्‍याचे जलपूजन आणि दरवाजा बंद करण्याचा कार्यक्रम आज पार पडला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

 

या बंधार्‍यामुळे उमरी, नयागाव, धर्माबाद आणि बिलोली तालुक्यात जलक्रांती येणार आहे. आंध्रप्रदेशाच्या हस्तक्षेपामुळे 1995 पासून हा बंधारा म्हणजे एक दिवास्वप्न ठरलं होतं. हे स्वप्न आज पूर्ण झालंय. या कार्यक्रमास परिसरातील हजारो शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.

 

सर्वोच्च न्यायलयाने 28 ऑक्टोबर पूर्वी बाभळीचे दरवाजे लावण्यास मनाई केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत आज हे दरवाजे बंद करण्यात आले.

 

त्यानंतर बंधार्‍याचं गेट अडवून बंधार्‍यात पाणी साठवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या बंधार्‍याचं काम पूर्ण झालंय. या बंधार्‍यामुळे नव्याने 6 हजार 395 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

 

गेल्या काही वर्षापासून कायम वादात असलेल्या या बंधार्‍याच्या कामावर नजर टाकूयात...

बाभळी बंधार्‍याचं जलपूजन

 • - गोदावरी नदीवर 1995 मध्ये मंजुरी
 • - 2005 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात
 • - सुरुवातीला 31 कोटी 58 लाख खर्च अपेक्षित
 • - आंध्र प्रदेशमधल्या नेत्यांचा विरोध
 • - पोचमपाड धरण कोरडं पडण्याचं कारण
 • - चंद्राबाबू नायडूंची बंधारा उध्वस्त करण्याची धमकी
 • - बाभळी कृती समिती आणि राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात बाजू मांडली
 • - सुप्रीम कोर्टात मान्यता
 • - 2011 मध्ये बंधार्‍याचं काम पूर्ण
 • - गेट बंद करायला कोर्टाची मनाई
 • - 28 फेब्रुवारी 2013- 29 ऑक्टोबर ते 1 जुलै दरम्यान गेट बंद करून पाणी साठवण्याचे कोर्टाचे आदेश

 बाभळी बंधार्‍याचा फायदा

 • - क्षमता-2.74 टी.एम.सी.
 • - 6395 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
 • - 4 शहरं आणि 35 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
 • - आंध्र सीमेवरच्या बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी या चार तालुक्यांत हरितक्रांती

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2013 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close