S M L

बीड बँक घोटाळ्याची CBI चौकशी करा -मुंडे

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2013 08:33 PM IST

munde on sharad pawar29 ऑक्टोबर : बीड जिल्हा बँकेचा वाद काही संपता संपेना. बीड बँकेत घोटाळा करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना बीडचे पोलीस पकडू शकत नाहीत. त्यामुळे या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मुंडेंनी केली. सहकार राज्य मंत्री सुरेश धस यांचीही चौकशी करा अशी मागणी करत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी धस यांच्यावरही तोफ डागली.

 

गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड इथं ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता. बँकेतील थकीत कर्ज प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार आणि काँग्रेसच्या खासदारांसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

 

परंतू अद्यापही कोणास अटक केली नाही त्यामुळे या मेळाव्यात मुंडे काय बोलतात या कडे सगळ्यांच लक्ष होतं आणि मुंडेनी हाच धागा पकडत बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागण्याची केलीय. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, वयोवृद्ध ऊसतोड कामगारास महिना 5,000 रुपये पेंशन चालू करा त्यांना घरकुल द्या तसंच त्याचा विमा उतरवा अशा मागण्या त्यांनी या मेळाव्यात केल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2013 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close