S M L

पुण्यात 16 लाखांची ब्राऊन शुगर जप्त : तिघांना अटक

6 फेब्रुवारी, पुणे पुण्यात अमलापदार्थविरोधी पथकानं 16 लाखाची ब्राऊन शुगर जप्त केलीय. मुंडवा भागातील झोपडपट्टीत अमलीपदार्थ विरोधी पथकानं छापा टाकला. यात त्यांनी तिघांना अटक केलीये. रफीक बेग, नझीर मोहम्मद अहमद शेख, शाहीद अशा तिघांकडून पुण्यातल्या हडपसर पोलिसांनी 1 किलो 20 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केलीये. या ब्राऊन शुगरची किमत भारतीय चलनात 16 लाख रुपये असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किमत सव्वा कोटी रुपये आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेला नझीर शेख हा पूर्वी मंुबईत ट्रॉम्बे परिसरात रहायचा. तो पूर्वी मुंबईत ड्रगची तस्करी करायचा. त्याचा मुलगा शाहीद याला चेन्नई पोलिसांनी ड्रग सप्लाय प्रकरणी अटक केलं होतं. हडपसर पोलिसांनी आरोपींना एनडीपीएस ऍक्टखाली अटक केलीये.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2009 12:51 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2009 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close