S M L

रोहितची डबल सेंच्युरी, भारताने मालिका जिंकली

Sachin Salve | Updated On: Nov 2, 2013 11:22 PM IST

रोहितची डबल सेंच्युरी, भारताने मालिका जिंकली

rohit502 नोव्हेंबर : भारतीय टीमचा तडाखेबाज फलंदाज आणि मुंबईकर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधातल्या सातव्या वनडे मॅचमध्ये रन्सची आतषबाजी करत दिवाळी साजरी केलीय. बंगळूरच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर रोहितने तडाखेबाज बॅटिंग करत 158 बॉल्सचा सामना करत तब्बल 16 सिक्स आणि 14 फोर ठोकत 209 रन्सची विक्रमी खेळी केलीय.

वनडे मॅचमध्ये दुसरी सेंच्युरी झळकावणार रोहित शर्मा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी डबल सेंच्युरी झळकावली होती. तसंच रोहितने ऑस्ट्रेलियाचा बॅटसमन वॉटसनचाही 15 सिक्सचा रेकॉर्ड मोडीत काढलाय.

अखेरच्या ओव्हरमध्ये सलग दोन सिक्स लावून रोहितने आपली डबल सेंच्युरी पूर्ण केली. मात्र अखेरच्या ओव्हरच्या तिसर्‍या बॉलवर तो आऊट झाला.

आज अखेरच्या वन डेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहितने सुरूवात दमदार केली. पण 60 रन्स करून शिखर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली शून्य रन्सवर रनआऊट झाला. त्यामुळे भारतीय बॅटिंग थोडी संथ झाली. मात्र रोहितची तडाखेबाज बॅटिंग सुरूच होती. 16 सिक्स आणि 12 फोर लगावत रोहितने शानदार डबल सेंच्युरी ठोकली. त्याच्यासोबतील कर्णधार महेंद्र सिंग धोणींने साथ देत 62 रन्स केले. रोहितची या विक्रमी खेळीवर भारताने 383 धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 384 धावांचं आव्हान ठेवलंय. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कांगारुंनी ३२६ रन्सवर सर्व बाद नांगी टाकली. भारताने ३-२ अशी मालिका जिंकली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2013 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close