S M L

पंतांनी घेतली पक्षनेतृत्वांची भेट

Samruddha Bhambure | Updated On: Nov 3, 2013 08:43 PM IST

udhav on joshi3 नोव्हेंबर : शिवसेना नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केल्याने शिवसैनिकांच्या रोष ओढवून घेणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष मनोहर जोशी यांची भेट घेतली. 'कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने उद्धवजींशी चर्चा होऊ शकली नाही. त्यांना केवळ दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचे जोशींनी सांगितले.

 

दसरा मेळाव्यातील या नाराजी नाट्यानंतर मनोहर जोशींनी आयबीएन लोकमलतला दिलेल्या मुलाखतीत जोशींनी पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच बोलवण आलं नाही तरी त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाऊ असे जोशींनी सांगितले होते.

 

आज दिवाळीच्या मुहूर्तावर जोशी मातोश्रीवर दाखल झाले. सुमारे तास भर ते मातोश्रीवर होते. त्यामुळे जोशी - ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची कमालीची उत्सुकता होती. मात्र मातोश्रीवर बाहेर पडल्यावर जोशींनी ठाकरेंशी चर्चा झालीच नाही असे सांगितले.

रामदास आठवलेंचीही मातोश्रीवारी

मनोहर जोशींपाठोपाठ महायुतीतील नाराज नेते रामदास आठवले यांनीदेखील रविवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2013 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close