S M L

मतदानपूर्व जनमत चाचणीवर निर्बंध आणा - काँग्रेस

Samruddha Bhambure | Updated On: Nov 3, 2013 06:51 PM IST

मतदानपूर्व जनमत चाचणीवर निर्बंध आणा - काँग्रेस

Image congress_aajcha_sawal_300x255.jpg3 नोव्हेंबर : २०१४ च्या निवडणुकीमध्ये  काँग्रेसच्या जागा कमी होतील असे भाकीत  मतदानपूर्व जनमत चाचणीत (ओपिनियन पोल) वर्तवले जात असल्याने बिथरलेल्या काँग्रेसने ओपिनियन पोलवर निर्बंध आणा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाही. ओपिनियन पोलमध्येही काँग्रेसच्या जागा कमी होती असे दिसून येते.

सीएनएन आयबीएन आणि द वीकने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला कमी जागा मिळेल व भाजपला बहुमत मिळेल असे दिसून आले होते.  यूपीए निवडणुकीत अवघ्या १३४ ते १४२ तर एनडीएला १८७ ते १९५ जागा मिळतील असे दिसून आले होते. मात्र यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे.

काँग्रेसने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले असून या पत्रात ओपिनियन पोलवर निर्बंध आणा अशी मागणी करण्यात आली आहे. 'अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची विश्वासार्हता नसते आणि त्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते असे या पत्रात म्हटले असून ओपिनियन पोलवरील निर्बंधांसंदर्भात आयोगाने सर्व राजकीय पक्षाची चर्चा करावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

 

सीएनएन - आयबीएन व द वीकचे सर्वेक्षणाचा अंदाज

 

एकूण जागा - 543

यूपीए - 134 ते 142

एनडीए - 187 ते 195

बसप - 15 ते 19

डावे - 22 ते 28

सपा - 17 ते 21

इतर - 147 ते 155

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2013 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close