S M L

दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मी पुजन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 3, 2013 08:43 PM IST

diwali diya3 नोव्हेंबर :  घरोघरी दिवाळीचा उत्साह. दिवे, गोडधोड, रांगोळी आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह थोड्याच वेळात पार पडणार लक्ष्मीपूजन. देशभरातही दिवाळी साजरी होत आहे.

दिवाळीचा आजचा दिवस खरा महत्त्वाचा. कारण काल नरक चतुर्दशी झाल्यानंतर आज घरोघरी लक्ष्मीपूजन होत आहे. घरात सुखसमृद्धी आणि वैभव नांदावं यासाठी सगळे जण लक्ष्मीची पूजा करतायत.

 

साडे सात नंतर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सुरू होत आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाची तयारीही घरोघरी आणि दुकानांमध्ये पूर्ण झालीय.

त्यानंतर चिल्लरपार्टी गोडधोड खाऊन आणि फटाके उडवत दिवाळीचा आनंद साजरा केला जाईल. खर्‍या अर्थानं आज दिवाळीचा उत्साह शिगेला पोचलेला असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2013 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close