S M L

मुंबईत अल्पवयीन मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार

Samruddha Bhambure | Updated On: Nov 4, 2013 07:57 PM IST

Image img_233172_rape345234_240x180.jpg4 नोव्हेंबर : देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी केली जात असतानाच मुंबईकरांची दिवाळी उत्सवाला गालबोट लावणारी संतापजनक घटना गोरेगाव येथे घडली.

 

 

एका अल्पवयीन मैत्रिणीला पुजेच्या बहाण्याने घरी बोलवून सहा नराधम मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

 

गोरेगावमध्ये राहणा-या एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पुजेच्या बहाण्याने घरी बोलवले.  ती  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. पुढे हे दोन मित्र तिला आपल्या अन्य मित्रांकडे घेऊन गेले. रात्री अकराच्या सुमारास घरी सोडण्याच्या निमित्ताने या तरुणीसोबत साधारण सहा तरुण होते. त्यांनी  तिच्यावर जबरदस्ती केली. तिने थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र तिचा विरोध नराधमांना थांबवू शकला नाही.

 

रात्री घरी परतल्यावर पिडीत मुलीने आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिने दिंडोशी पोलिसांकडे सहा जणांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2013 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close