S M L

सर्वच सर्व्हेमध्ये फेरफार नसते, काँग्रेसची सारवासारव

Samruddha Bhambure | Updated On: Nov 5, 2013 02:13 PM IST

Image img_193262_congress_240x180.jpg5 नोव्हेंबर : निवडणूकपूर्व जनमत चाचणीत फेरफार होत असल्याचे सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणा-या काँग्रेसवर टीकेची झोड उठल्यानंतर काँग्रेसने यावर आता सावध भूमिका घेतली आहे. सर्वच जनमत चाचण्यांमध्ये फेरफार होत नाही असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या निवडणूकपूर्व जनतम चाचणीमध्ये (ओपिनियन पोल) काँग्रेसच्या जागा कमी होतील असे भाकीत वर्तवले जात असल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजीचे चलबिचल झाली होती. यानंतर अशा ओपिनियन पोलवरच बंदी टाकावी अशी मागणी काँग्रेसने केली होती.  'अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची विश्वासार्हता नसते. सर्व्हेत फेरफार करुन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. पैसे मोजून कुणीही अशा जनमत चाचण्या करू शकतं असा आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला होता.

 

यावरुन भाजपने काँग्रेसवर कडाडून टीका केली होती. काँग्रेस कोर्टावरही बंदी आणू शकते अशी बोचरी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली होती. चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर काँग्रेसने याबाबत आस्तेकदम जाण्याचे ठरवलेले दिसते. काही जनमत चाचण्यांमध्ये फेरफार केले जात असून सर्वच जनमत चाचण्यांमध्ये असे फेरफार होत नाही अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी मांडली आहे.

 

दरम्यान, काँग्रेसच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांकडून जनमत चाचणीबद्दल मत मागितले होते. काँग्रेसने त्यांचे मत निवडणूक आयोगाला कळवले आहे. यानंतर ऍटर्नी जनरलन यांनी केंद्र सरकारला पत्राद्वारे त्यांचे मत कळवले आहे. जनमत चाचण्यांवर बंदी घालावी असे मतं ऍटर्नी जनरल यांनी या पत्रात मांडले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग जनमत चाचणीबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2013 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close