S M L

विश्व साहित्य संमेलनासाठी पहिली टीम रवाना

शिल्पा गाड मुंबईअमेरिकेत होणा-या पहिल्या विश्व साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. संमेलनासाठी पहिली बॅच पहाटे सॅन होजेला रवाना झाली. यात ज्येष्ठ कथाकार द. मा. मिरासदार, प्रवीण दवणे यांच्यासह चाळीस जण होते. ज्येष्ठ कथाकार द.मा.मिरासदार म्हणाले, मला ह्या सगळ्या संमेलनाविषयी एक उत्सुकता आहे. तरुण मुलांना भेटण्याचा हा अनुभव निश्चितच खूप थ्रिलिंग आहे. सामान्यांना सॅन होजेला प्रत्यक्ष जाणं शक्य नसलं तरी, या संमेलनाचं थेट प्रक्षेपण झगमग डॉट कॉम या साईटवरून लाइव्ह केलं जाणार आहे. त्यामुळे ते केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात दिसणारआहे. म्हणून ते ख-या अर्थानं विश्वसंमेलन ठरणार आहे.या संमेलनाच्या निमित्तानं आणखी एक नवीन कन्सेप्ट सुरू झाला आहे आणि तो म्हणजे संमेलनासोवतच्या सहलीचा. या कन्सेप्ट बद्दल राजाराणी ट्रॅव्हल्सचे सीइओ अभिजित पाटील सांगतात, आम्ही विचार केला की एवढ्या लांब, अमेरिकेत लोकं सहलीसाठी जाणार तर त्याबरोबर त्यांना अमेरिकेची आजूबाजूची ठिकाणंही पहायला मिळावीत त्यामुळे अशा पॅकेजच आयोजन केलं गेलं.या सहल कम संमेलनासाठी आतापर्यंत जवळपास 300 लोकांनी नावनोंदणी केली आहे.सुरुवातीपासूनच हे संमेलन कायमच वादात सापडलं. पण किमान या निमित्तानं संमेलन टुरिझमचा नवा कन्सेप्ट मराठीत सुरू झाला. हेही नसे थोडके.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2009 11:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2009 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close