S M L

सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 5, 2013 10:00 PM IST

Image img_235722_junnarrapecase3244_240x180.jpg5 नोव्हेंबर :दिंडोशी सामुहिक बलात्कारप्रकरणी आज तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. शुक्रवारी गोरेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

 

गोरेगावमध्ये राहणा-या अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पुजेच्या बहाण्याने घरी बोलवले.  ती  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. पुढे हे दोन मित्र तिला आपल्या अन्य मित्रांकडे घेऊन गेले. रात्री अकराच्या सुमारास घरी सोडण्याच्या निमित्ताने या तरुणीसोबत साधारण सहा तरुण होते. त्यांनी  तिच्यावर जबरदस्ती केली. तिने थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र तिचा विरोध नराधमांना थांबवू शकला नाही.

 

या मुलीने आईवडिलांना घाबरत घाबरत हा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  दिंडोशी पोलीस या तरुणीची तक्रार नोंदवून घेत नव्हते. मात्र एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नाने अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केल्याचे समजते. आरोपींना  12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय तर तक्रार दाखल करण्यास ताळाताळ करणार्‍या 2 पोलिस आधिकार्‍यांना निलंबीत करण्याची मागणी पीडीत मुलीच्या घरातल्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2013 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close