S M L

श्रीलंकेला ब्राऊन वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज

7 फेब्रुवारी पवित्रा सझावल भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाचवी आणि शेवटची वन डे मॅच रविवारी कोलंबो इथं होणार आहे. ही मॅच जिंकून आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घ्यायची संधी भारतीय टीमला आहे. पण कॅप्टन धोणीच्या म्हणण्यानुसार, भारतीय टीमला नंबर वनची चिंता नाही. तर श्रीलंकेसारख्या बलाढ्य टीमला त्यांच्याच भूमीत 5-0 अशी धूळ चारण्यासाठी भारतीय टीम उत्सुक आहे. अलीकडच्या काही भारतीय टीम्समध्ये ही सर्वोत्तम टीम मानली जातेय.सलग नऊ वन डे जिंकण्याचा विक्रम या टीमने केला आहे. महेंद्र सिंग धोणीच्या कप्तानीखाली टीमने ही किमया केली आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही टीमची कामगिरी श्रीलंकेपेक्षा उजवी ठरली. भारतीय टीमने या सीरिजमध्ये दाखवलेलं सातत्य वाखाणण्यासारखं आहे. एका मॅचमध्ये सेहवाग आणि युवराज आपला धडाका दाखवतात तर पुढच्या मॅचमध्ये गौतम गंभीरच्या बॅटमधून रन्सची बरसात होते. झहीरची बॉलिंग एखाद्यावेळी चांगली होत नसेल तर ईशांत आणि प्रवीण कुमार नकळत त्याच्यावरचं दडपण दूर करतात. प्रग्यान ओझाने हरभजनच्या अनुपस्थितीत स्पिनची बाजू समर्थपणे पेललीय. वैयक्तिक कामगिरीपेक्षा टीमची गरज महत्त्वाची हे तत्व कॅप्टन धोणी आणि कोच गॅरी कर्स्टनने आपल्या टीमच्या मनावर बिंबवलंय. आणि टीमने त्याचं तंतोतंत पालन केलंय. याउलट श्रीलंकेच्या टीमला मात्र विजयाची वाट शोधूनही सापडत नाही. क्रिकेट फॅन्सनाही आपला राग लपवता येत नाही. त्यांचे प्रमुख बॅट्समन आणि बॉलरनीही त्यांची निराशा केली. फिल्डिंगही मनासारखी होत नाही. अशावेळी उद्याची मॅच त्यांच्यासाठी कठीणच जाणार आहे. भारतीय टीमने सलग दोन वन डे सीरिज जिंकल्या आहेत. पण उद्याची मॅच जिंकून दोन्ही सीरिजमध्ये प्रतिस्पर्ध्यांना व्हाईटवॉश द्यायचा टीमचा प्रयत्न असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2009 01:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2009 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close