S M L

कांद्या नंतर आता टोमॅटोने केले वांदे

Samruddha Bhambure | Updated On: Nov 7, 2013 06:43 PM IST

कांद्या नंतर आता टोमॅटोने केले वांदे

7 नोव्हेंबर : पुकांद्यानंतर आता टोमॅटोची सुध्दा भाववाढ झालीय. टोमॅटोचा भाव 22 रुपये किलोवरून 40 रुपये किलोवर गेला आहे.  छोट्या मार्केटमध्ये हेच दर ६0 रुपये किलो एवढे झाले आहेत.

 

अवकाळी पावसाचा शेतीमालाच्या उत्पादनावर परिणाम झालाय. आणि बाजारामध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे. दर दिवशी बाजारामध्ये 80 ते 90 गाड्यांची आवक होते मात्र आज फक्त 25 गाड्यांची आवक झालीय. तर राज्यात अशीच परिस्थिती असल्याने याचा परिणाम किमतीवर झालाय. त्यामुळे साधारण महिनाभर तरी अशीच परिस्थिती राहणार, असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे.

टोमॅटोच्या भाववाढमुळे आता टोमॅटो केचप, पावभाजी सारख्या आवत्या खाद्यप्रकाराचेही भावात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे घरातल्या होम मिनिस्टर मात्र नाखुश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2013 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close