S M L

छटपुजेवरुन मनसे-भाजप आमनेसामने

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2013 06:48 PM IST

Image img_9231_chatpujajp_240x180.jpg

विनोद तळेकर , मुंबई

8  नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांपासून शांततेत पार पडणा-या छटपूजेवरुन यंदा मुंबईतील 'राज'कीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजपने छटपूजेची शुभेच्छा देणारे फलक शहरभर लावून मनसेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून छटपूजेवरुन भाजप नाहक राजकारण करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

 

सध्या मुंबईतील विविध भागांमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे छटपूजेची शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकत आहे. मनसेने यापूर्वी छटपूजेला कडाडून विरोध दर्शवला होता. यापार्श्वभूमीवर छटपूजेच्या माध्यमातून भाजपने मनसेला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शेलार यांच्या बॅनरबाजीला मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे.

 

छटपूजेवरुन  राजकीय आखाडा रंगला असतानाच छटपूजेच्या आयोजनाचा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाने मन रंगलो या संघटनेला छटपुजेची परवानगी नाकारली. मात्र बिहारी फ्रंन्ट, श्री गणेश नेहरूनगर रहिवासी संघ आणि छट उत्सव महासंघ या संघटनांना नियमबध्द पद्धतीने उत्सव साजरा केल्याने त्यांना छटपूजेच आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. एकंदरीत छटपूजेचा उत्सव हा त्या मागच्या धार्मिक भावनेपेक्षा राजकीय अर्थाने अधिक गाजतो हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2013 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close