S M L

नो मुस्लिम प्लीज - मुंबईत घर घेण्याचे स्वप्न अधुरेच

Samruddha Bhambure | Updated On: Nov 8, 2013 09:15 PM IST

नो मुस्लिम प्लीज - मुंबईत घर घेण्याचे स्वप्न अधुरेच

99acrs copyस्मिता नायरसह ,मुंबई

8 नोव्हेंबर : मोठ्या गृहसंकुलात घर विकत किंवा भाड्यानं घेण म्हणजे मुस्लिमांसाठी तारेवरची कसरतच असते. ऐरवी गृहसंकुलांमधील हा मुस्लिमविरोध चोरीछुपे सुरु असला तरी एका बांधकाम व्यावसायिकाने वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही असा स्पष्ट उल्लेख केल्याने या मुस्लिमविरोधाला वाचा फुटली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मुस्लिमांसाठी घर घेण किती कठीण असतं हे सीएनएन-आयबीएनच्या कोब्रापोस्ट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाले होते.  'उत्कृष्ट नवाकोरा 2BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट, मोकळी हवा, नैसर्गिक प्रकाश, उच्चभ्रू सोसायटी, मुस्लिम नकोत, कार पार्किंगसह तात्काळ विक्री, पाचवा मजला, इच्छुकांनी कृपया कॉल करावा.' जाहिरातीत उल्लेख असलेल्या दादरमधल्या मध्यवर्ती भागातल्या या सोसायटीला आयबीएन-नेटवर्कच्या टीमनं भेट दिली होती. त्यावेळी सोसायटीत फक्त शाकाहारी लोकच राहतात. त्यामुळे मुस्लिमांना इथले फ्लॅट विकले जात नाहीत असे स्थानिकांनी सांगितले होते .मात्र त्यानंतरही मुंबईतील गृहसंकुलामधील नो मुस्लिम प्लीजचा फलक खाली उतरताना दिसत नाही. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात आघाडीच्या समजल्या जाणा-या ९९ एकर्स या रिएल्टी वेबपोर्टलवरील एका जाहिरातीमुळे मुस्लिमविरोध पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

या जाहिरातीमध्ये जागा विकायची आहे तसेच घर भाड्याने द्यायचे आहे अशा स्वरुपाची एक जाहिरात आहे. मात्र या जाहिरातीमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वेबसाईटवर अशा प्रकारची ही पहिलीच जाहिरात नाही. वेबपोर्टलवर नो मुस्लिम्स सर्च केल्यास असे शेकडो जाहिराती पाहायला मिळतात. या जाहिरातींविरोधात अ‍ॅडव्होकेट शेहजाद पूनावाला यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केली आहे.

तर 99 एकर्स डॉट कॉमने या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देताना  म्हटलंय, "आमची कंपनी अशा सापत्नभावाच्या वागणुकीच्या पूर्णपणे विरोधात आहे. कोणत्याही वेळी 99 acres.com वर 4 लाखांपेक्षा जास्त जाहिराती असतात. आमच्या सेल्फ-सर्व्हिस ऑनलाईनचा वापर करत जाहिरातदारांकडून या जाहिराती थेट अपलोड केल्या जातात. आमच्या साईटचा असा गैरवापर होत झाल्याचं पाहून आम्हाला खेद वाटतो.'

नुकतंच राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात रेहमान समितीनं हा मुद्दा मांडला होता. मुंबई आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मुस्लिमांना आरक्षण मिळावं, अशी शिफारस त्यांनी केली होती. सरकारनं हा कायदा केलाच तर सोसायट्यांमध्ये कदाचित मुस्लिमांना जागा मिळेल. पण अशा प्रवृत्तीच्या जाहिरात देणार्‍या लोकांच्या मनात त्यांना कधी स्थान मिळेल, हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2013 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close