S M L

चेन्नईत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपला सुरुवात

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2013 07:36 PM IST

चेन्नईत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपला सुरुवात

vishvanath aanad09 नोव्हेंबर : चेन्नईत आजपासून वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपची फायनल सुरू होतेय. या फायनलमध्ये सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला आव्हान दिलंय ते वर्ल्ड नंबर वन असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसननं..

आनंद सध्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. पण याअगोदर आनंदनं तब्बल 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे मॅग्नस कार्लसनला हे आव्हान सोपं नसेल. पण 22 वर्षांचा कार्लसन हा त्याच्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे.

आपल्या तुफान कामगिरीच्या जोरावर तो लहान वयातच जागतिक क्रमवारीत अव्वल बनलाय. त्यामुळे आनंदसमोरही हे एक कडवं आव्हान आहे.

9 नोव्हेंबरपासून ते 28 नोव्हेंबरपर्यंत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलचा थरार रंगणार आहे. ही फायनल 12 फेर्‍यांची असेल. या स्पर्धेत आनंद काळ्या मोहोर्‍यांनी सुरुवात करणार आहे. ही चेस चॅम्पियनशिप भारतात आणि तेही आनंदच्याच शहरात म्हणजे चेन्नईत होणार असल्यानं या स्पर्धेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2013 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close